मित्रानी सांगितलेली भूताची गोष्ट
टिपः इथे मि चा उच्चार म्हणजे मित्र
एकदा माझ्या मित्राला एका नामांकित कंपनी मध्ये नोकरी मिळाली. ती एक शेअर ब्रोकिंग कंपनी होती. तो तिथे कमिशन तत्वावर काम करत असे .त्याला ड़िमॅट खाते उघडायचे काम कंपनीने दिले होते. खाते उघडायला तो शहरात तसेच गामिण भागात जात असे. ग्राहकाकड़े जाऊन खाते उघडणे हि त्याची दैनंदिनी होती. एकदा काय झाले त्याला खाते उघडण्यासाठी शहराच्या बाहेर ग्रामीण भागात अंदाजे 30 ते 40 किलोमीटर जावे लागले. तिथे त्याला खाते फार्म भरण्यात दिवस पालटला. संध्याकाळचे सात वाजले पण अजून त्याला काही लोकांची खाते फार्म भरायची होती.बघता बघता रात्रीचे 10 वाजून गेले आणि आता त्याला निघायची घाई झाली. तेवढ्यात त्याला एका ग्राहकाने रात्रीचे जेवायला आग्रह केला आणि जायला आॅटोसारखे साधने उपलब्ध होतील असे सांगितले. त्यांने लगबगीने कसेबसे जेवण आटोपून जायला निघाला .ते गाव थोडे आडोशाला होते.पण मोठ्या रस्त्यापर्यंत जायला गावापासून त्याला एक आटो मिळाला तो तिथपर्यंत पोहचला .आता त्याला मोठ्या रस्त्यापासून शहरात यायला 35 किलोमीटर पेक्षा जास्त मार्ग गाठायचे होते .रात्रीचे साड़े दहा वाजले .जशी जशी रात्र होत चालली तशी तशी वाहतूक विरळ होऊ लागली. थंडीचे दिवस असल्याने थंडी बोचायला लागली. बराच वेळ झाला जाण्यासाठी साधने भेटत नव्हती
रात्रीचे साड़े अकरा झालेत. तेवढ्यात एक आटो थांबला त्यात आधीपासून दोन महिला घूंघट घातलेल्या व काळे लांब कपडे घातलेल्या बसून होत्या . त्यांच्या वेशावरून त्या राजस्थानी वाटत होत्या. दोन पूरूष पण बसलेले होते. त्यातला एक तर भयानकच वाटायचा मोठ्या डोळ्यांचा व जाड मिश्यांचा माणूस त्याला बघून भिती वाटावी असाच तो होता.तर दुसरा डोळे वर करून झोपलेल्या अवस्थेत होता. नाईलाजाने त्या आटोमधे बसावे लागले कारण बराच वेळाने हा आटो मिळाला होता . आटो शहराच्या दिशेने निघाला रात्र अमावस्येची असल्याने आजूबाजूला बघितले की काळाकुट्ट अंधार दिसायचा. आटोचा लाइट पण तसा डिमच होता. रात्रीची ती भयाण शांतता भीती भरवणारी वाटत होती आणि अजून आटोमधेही कोणीच कोणाशी बोलत नव्हते .मी जेव्हा जेव्हा आटोतल्या त्या माणसाला बघत असे तेव्हा तेव्हा तो मनुष्य मोठ्या डोळ्यांनी मान वळवून माझ्या कडे बघायचा मी नजर चुकवून किंवा नजर खाली करून घ्यायचो. आणि समोर बघीतले कि चेहरे झाकलेल्या काळे अंगरखा घातलेल्या त्या स्त्रिया काळ्या कपड्यात पायापर्यंत लांब घोळत असलेला त्यांचा सदरा घाबरवण्या सारखा होता. आणि एक सारख्या त्या माझ्याकडे बघत आहेत अशी त्यांची मुद्रा होती. आटो पण बिलकुल हळू चालत होता. माझ्या मनात पण थोडी थोडी भिती निर्माण झाली.मी हिमतीने त्या आटोवाल्याला म्हटले दादा थोडा जोरात घे आटो शहर अजून दूर आहे त्यावर तो म्हणाला आटो हळू चालवायला सांगितले ह्यांनी आणि आज आटो पण जोरात पळत नाही हे त्याचे स्वर पूर्ण घाबरलेल्या आवाजात होते. तसेच त्याच्या शर्टाकडे बघीतले असता तो पूर्ण घामाघूम झालेला होता.मला पण त्यांच्याकडे बघितल्यावर भिती वाटू लागली. मी ड़ोळे मिटून मनातल्या मनात देवाचे स्मरण करु लागलो थोडा वेळ गेल्या नंतर आटोतल्या एकाने आटो मधेच थांबवायला सांगितले. चारही व्यक्ती आटो मधून एका मागोमाग एक उतरायला लागले. उतरताना घूंघट घातलेल्या एका स्त्रीचे पाय वाकडे आणि उलटे दिसले.आणि मी अजूनच घाबरलो . मी आटोवाल्याला घाई करून आटो पटकन काढण्यास सांगितले आटो वाल्याने सुद्धा आटो लवकरच काढला. आटो निघाला आटो मधे आता आम्ही दोघेच पण आम्ही दोघेही स्तब्ध .तोंडावाटे शब्दच निघत नव्हते .आटो पुढे पूढे जात होता कि अचानक टायर फुटण्याचा आवाज आला.आटो रस्त्याच्या कडेला थांबला अशा ठिकाणी टायर पंक्चर झाला की रस्ता सुनसान होता. सगळीकडे अंधार आणि अंधार होता. सर्वीकडे भयाण शांतता होती.मनात भिती भरली होती. मी आटोवाल्याला स्टेपणी बद्दल विचारले त्यांनी हळू आवाजात आहे म्हणाला. मी म्हणालो अरे लवकर कर बराच उशीर झालेला आहे. त्यांने स्टेपणी लवकरच जोडली. पण तेवढ्यात दोन स्त्रिया कूठून आटोजवळ आल्या आणि आपणाला शहराकडे जायचे आहे असे म्हणून आटोमधे बसल्या आटोवाल्याला आणि मला काही सूचेना मनातील भिती अजूनच वाढली.त्या स्त्रिया इतक्या रात्री कूठे जात असाव्यात मनात भलतेच विचार सूरू झाले. स्टेपणी लावून झाली होती .मी आटो काढण्यास सांगितले तसे निघालो त्या स्त्रिया ग्रामीण भागातील वाटत होत्या मी थोडी हिमतीने त्यांना एवढ्या रात्री उशिरा जाण्याचे कारण विचारले तर त्यातील एक स्त्री जिच्या कपाळावर मोठे कुंकू होते व केसाची एक लट तिच्या चेहर्यावर आली होती ती स्त्री म्हणाली आ आम्ही रस्ता भटकलो बर्याच वेळा पासून इथेच फिरत आहोत तिच्या ह्या बोलण्यात भिती अजिबात नव्हती व तिच्या चेहर्यावरचे हावभाव काहीसे विचित्र व भितिदायक वाटले तसे ते हावभाव ओळखीचे वाटले मित्राला आधी बसलेले जे चार लोक होते त्यातिल एका स्त्रीचे असेच हावभाव होते. आता मित्राला सर्व काही घड़लेल्या घटना समजायला येऊ लागल्या मनात अजून भिती भरली तेवढ्यात आटोवाला बोलला साहेब एक गोष्ट विचारू ज्या आधी काळ्या कपड्यातल्या स्त्रिया होत्या त्यांचे पाय वाकडे व उलटे होते तूम्ही बघीतले काय मित्र काही बोलेना हे ऐकून त्या स्त्रिया उदगारल्या बघा माझे पाय बघा माझे पाय तर त्यांचे पाय पण सेम उलटे आणि वाकडे होते हे बघून मि पूर्ण पणे घाबरलो आणि ओरडलो वाचवा आणि धावत्या आटो मधून उड़ी मारली घाबरून सैरावैरा पळायला लागलो कुठेतरी आटो आपटल्याचा आवाज आला पण मागे न बघता कसे शहर गाठले हे मलाच (मित्र) ठाउक .
टिपःइथे मी म्हणजे मीच.
दोन दिवसांनंतर मी मित्राला भेटायला गेलो तर तो तापाने होता त्याने घडलेला प्रसंग सांगितला. मी त्याला विचारले आटोवाल्याचे काय झाले तर त्याने मला पेपरचे कात्रण दाखवले बघतो तर काय अपघातात ड़्रायवरचे निधन. $$$

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा