गुरुवार, २ जानेवारी, २०२०

गोष्ट

                              गोष्ट
एकदा बाल्या आपल्या आई-बाबासोबत एका बागेत फिरायला  गेला.बागेजवळच सुंदर मंदिर होतं. तिथे त्यांनी दर्शन घेतले आणि जरावेळ मंदिरात बसले.पण बाल्या काही एका जागी बसायला तयार नव्हता, खेळत खेळत तो मंदिराच्या मागच्या बाजूला गेला. तिथे एक म्हातारी आजी बसलेली होती. कपडे मुकेश अन् फाटलेले  केस विखुरलेले होते. पायात चप्पल नव्हती.काठीच्या आधाराने ती कशीबशी ऊठू पाहत होती.
बाल्या हे सर्व दुरून बघत होता. तो त्या आजी जवळ गेला. त्यांना उठायला मदत केली. त्यांना पाणी हवे होते म्हणुन बाल्याने
त्याच्याजवळच्या बाटलीतले पाणी त्यांना दिले. हातातला बिस्किटचा पूड़ा दिला. इकडे आईबाबा बाल्या कुठे गेला म्हणून शोधू लागले. इतक्यात बाल्या त्या आजीला हाताला धरून घेऊन आला. आईवडील आश्चर्याने आणि कौतुकाने 
त्याच्याकडे बघू लागले. बाल्या च्या आईवडिलांनी चौकशी केली. घरी येण्याचा आग्रह केला. पण तिने साफ नकार दिला. कारण तिथे तिच्या खूप आठवणी होत्या. ती सांगू लागली, आधी आमचे कुटुंब खूप श्रीमंत होते. सगळे आनंदी होते. असेच एकदा आम्ही सारे इथं फिरायला आलो म्हणाली. पलीकडच्या तळ्यात बोटीत बसलो. त्याच्या मधोमध जाताच आमची बोट उलटली. दैवयोगाने मी एकटीच वाचले. नवरा, मुलगा, मुलगी सारेच मला सोडून गेले कायमचे .म्हणून मी मंदिरामागे बसून तुझ्याकडे एकटक बघत असते. तिची मन हेलावणा कथा ऐकून बाल्या च्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आले आणी बाल्याला पण रडू आले. त्यांनी तिला खायला आणून दिले आणि निरोप घेतला. घरी जाऊन बाल्या आईला म्हणाला, आई आजपासून दर आठवड्याला आपण त्या आजीला भेटायला जायचं.आई-बाबांनी लगेचच होकार दिला. त्या दिवसापासून दर रविवारी ते बागेतल्या मंदिरात जाऊ लागले. आवश्यक कपडे, अंथरून, ब्लँकेट, मच्छरदाणी  इत्यादी वस्तू तिला नेऊन दिल्या. बाल्या च्या आईवडिलांनाही बाल्या चा कनवाळूपणा सुखावून गेला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा